About us
Creating Bright Futures for Orphaned Children
We all need support through the most important period of our children: the early years
At Spandan Bal Ashram, we are dedicated to providing a nurturing and supportive home for orphaned and vulnerable children. Our mission is to create a loving and stable environment where every child feels valued, safe, and inspired to thrive. We focus on addressing the unique needs of each child, fostering their physical, emotional, educational, and social development. Through compassionate guidance and personalized attention, we aim to instill confidence, resilience, and a sense of belonging, laying the foundation for a brighter future.
Vision
Mission
Founder & Head Bal Ashram
Mr.& Mrs Manoj Mhaske, the founder and head of Spandan Bal Ashram, started the ashram with a vision to provide a loving home for orphaned children. Despite facing significant financial challenges and limited resources in the initial days, his unwavering dedication and perseverance have transformed the ashram into a nurturing haven for many children.
Manoj’s vision is to create a loving, nurturing home for orphaned children’s holistic development.
नमस्कार, मी मनोज भिमराव मस्के. माझा जन्म पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव या छोट्याशा गावात झाला. वडील पुण्यामध्ये नोकरीला असल्यामुळे माझे बालपण पुण्यात गेले. मला समाजसेवेची आवड होती. कोविड काळामध्ये लोकांचे खूप हाल झाले होते, अनेक कुटुंबे उध्वस्त झाली होती. त्या काळात प्रत्येक घरातून कोणीतरी आधार निघून जात होता. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होते. कोरोना काळामध्ये मी गावात होतो. त्यावेळेस गावाकडील ऊसतोड मजूर, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांच्या शिक्षणाचे खूप हाल होत होते.
त्यावेळेस माझ्या मनात आले की आपण या मुलांसाठी, या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. लॉकडाऊन संपल्यानंतर मी पुण्यात आलो. माझा व्यवसाय भाजीपाला सप्लायचा होता. मी हॉटेल्स आणि कंपन्यांना भाजीपाला पुरवत होतो. पण कोविड काळात बरेच हॉटेल्स बंद झाल्यामुळे माझा व्यवसायही बंद झाला. त्यानंतर मी रिक्षा चालवायला सुरुवात केली. परंतु मला समाजासाठी काहीतरी करायचे होते. त्या मुलांचे हाल बघवत नव्हते. मी माझ्या पत्नीला सांगितले की जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना कोणाचा आधार नाही, अशा मुलांसाठी आपण काहीतरी करू. त्यावेळेस तिने मला सल्ला दिला की आपण त्यांचे संगोपन करू. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
त्यानंतर मी माझ्या मित्रांना सांगितले की मला अनाथ आणि गरजू मुलांसाठी शिक्षण व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. रिक्षा चालवत असताना मला एके दिवशी एक मुलगी मोरवाडी चौकात भंगार गोळा करत असताना दिसली. मी तिला विचारले की तुझे आई-वडील कुठे आहेत. तिने सांगितले की माझे आई आणि वडील दोघेही या जगामध्ये नाहीत. हे ऐकून मला खूप दुःख झाले. तिची ती अवस्था बघवत नव्हती. त्या वेळेस ठरवले की आपण इथूनच सुरुवात करावी. मी माझ्या पत्नीला फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली. तिने कुठलाही विचार न करता त्या मुलीचे आपण संगोपन करू असे सांगितले.
त्या मुलीची चौकशी केली असता, तिने सांगितले की ती तिच्या आजीकडे राहते. आम्ही तिच्या आजीला विचारले. तिने संगोपणाबद्दल होकार दिला आणि आम्ही तिला घरी घेऊन आलो. थोड्याच दिवसात एक दुसऱ्या आजी माझ्याकडे आल्या. त्यांनी त्यांच्या नातवाचीही परिस्थिती सांगितली. त्याचा नातू वीटभट्टीवर काम करायला जात होता. त्या मुलाचे वडील त्याला काम करायला लावत होते. परिस्थिती खूप हालाखीची होती. मी हे दुःख बघू शकत नव्हतो.
मी निर्णय घेतला आणि एक रूम भाड्याने घेतली. तिथे मुलांचे संगोपन सुरू केले. माझ्याकडे ज्यांचे आई-वडील नाहीत असे, हालाखीची परिस्थिती असणारे मुले येऊ लागली. मी रिक्षा चालवून माझा प्रपंच चालवत होतो. सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला, पण मुलांसाठी हे सर्व करायचे आहे, यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले. खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी मित्रांकडून राशन जमा केले. काहीजणांनी भांडी दिली. सुरुवातीच्या वर्षात माझ्याकडे सात मुले होती. मी त्यांचे ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेत केले. दुसऱ्या वर्षी माझ्याकडे 20 मुले-मुली झाली.
मुलांची संख्या वाढल्यामुळे सर्व गोष्टींवर ताण येऊ लागला. मी दिवसभर कामाला जायचो. पत्नीवर स्वयंपाकाचा लोड वाढला. रोजची मिळकत हजार रुपये असायची, आणि खर्च पंधराशे रुपये. त्यामध्ये रूम भाडे, भाजीपाला, लाईट बिल या सर्व गोष्टी बघाव्या लागत होत्या. हॉस्पिटलचा खर्चही कधी वाढत होता. परिस्थिती खूप कठीण झाली होती. रूम भाडे, लाईट बिल थकले. आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. परंतु त्या स्थितीतही आम्ही माघार घेतली नाही. माझ्या पत्नीने तिचे मंगळसूत्र गहाण ठेवले आणि आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले. मी दिवसभर आणि रात्री रिक्षा चालवत होतो.
आमचा संघर्ष बघून समाजातील काही लोकांनी मदत करायला सुरुवात केली. काही लोकांनी राशन, दूध द्यायला सुरुवात केली. तिथून जेवणाचा खर्च कमी झाला. मी अजून उत्साहाने काम करू लागलो. एका कम्युनिटी ब्रँड कंपनीने कम्प्युटर दिले. मराठवाडा मित्र मंडळाने फ्रिज
दिला. अशा प्रकारे एक एक वस्तू जमा होत गेल्या. तिथून पुढे मी मुलांच्या शिक्षणावर भर द्यायला सुरुवात केली. एक शिक्षक मुलांना शिकवायला येतात. शिक्षण आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीकडे लक्ष देतो. आता आमच्याकडे 35 मुले-मुली आहेत.
आश्रमातील सगळ्या मुलांकडे बारकाईने लक्ष दिले जाते. कोणता मुलगा कसा आहे, त्याची भविष्यात प्रगती होईल का, यावर लक्ष दिले जाते. मी समाजातील अनेक लोकांना भेटतो, त्यांना या प्रयत्नांबद्दल माहिती देतो. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य कशाप्रकारे लागू शकते, याची माहिती देतो. मी आणि माझी पत्नी मुलांचे भविष्य घडवण्यासाठी जे काही करता येईल, ते पूर्ण प्रयत्न करतो.
माझ्या कामाच्या माध्यमातून, आम्ही अनेक मुलांना त्यांच्या शिक्षणाच्या आणि जीवनाच्या प्रवासात सहाय्य केले आहे. आज आमच्याकडे असलेल्या मुलांपैकी काहींनी शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे, तर काहींनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केले आहे. या मुलांची प्रगती बघून आम्हाला खूप आनंद होतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
आम्ही या मुलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. त्यांच्यासाठी शिबिरांचे आयोजन करतो. त्यांना विविध कलेचे, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देतो. त्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. आमच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांचे जीवन बदलले आहे आणि त्यांची भविष्यातील वाटचाल अधिक सुलभ झाली आहे.
आमच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. त्यांच्या निराश डोळ्यांत पुन्हा एकदा आशेची किरणे दिसू लागली आहेत. त्यांच्या भविष्याची जबाबदारी घेताना आमच्या हृदयात एक विशेष आनंदाची अनुभूती होते. हे काम आम्हाला खूप समाधान देत आहे. आम्हाला माहित आहे की या मुलांच्या जीवनात आम्ही एक छोटासा बदल घडवू शकतो, आणि त्यांच्या भविष्याला उज्वल बनवू शकतो.
या मुलांचे संगोपन करण्यासाठी देवाने संपूर्ण शक्ती द्यावी. येणाऱ्या काळात अशा सेवेसाठी बळ द्यावे. आम्ही आमचे संपूर्ण जीवन मुलांच्या संगोपनासाठी आणि भविष्यातील जडणघडणीसाठी दिले आहे. समाजातील लोकांनीही या कार्यात सहभागी व्हावे, असे आमचे आवाहन आहे. आपण सर्व मिळून या मुलांचे भविष्य उज्ज्वल करूया. धन्यवाद.
Holistic Development
We address the physical, emotional, educational, and social needs of each child to ensure comprehensive growth.
Loving Environment
Creating a nurturing and stable home where every child feels valued, safe, and inspired to thrive.
Personalized Attention
Providing compassionate guidance and individualized care to instill confidence, resilience, and a sense of belonging.
Community Integration
Promoting inclusivity, respect, and cultural understanding to prepare children for successful integration into society.
TRUST REGISTRATION DETAILS
Pulvinar ultrices porta mattis quis lobortis est facilisis purus nunc, sed semper enim dictum sed donec condimentum sodales sed non vel malesuada morbi arcu justo, pretium sagittis hac nisi amet, fermentum nunc.
- Trust Registration No: F-0059847(PUN)
- PAN Number: ABETS9267J
- 12A Provisional Registration: ABETS9267JE20221
- 80G Tax Exemption Provisional: ABETS9267JF20221
- NGO DARPAN Portal: MH/2022/0328333
- CSR Registration No: CSR00041911
What we do?
Food
Shivshakti Social Foundetion lays great emphasis on
providing a very healthy diet to the children. Healthful
food builds children who think more clearly, are less
prone to illness and are stronger and lead longer and
healthier lives.
Education
At Orphanages, we provide access to quality
education. Education is not limited to schooling,
passing examinations, and jumping to higher grades.
We impart discipline, soft skills, lessons from life
experiences, and spiritual education.
Clothing
The utility of clothing goes far beyond its importance as
protection from extreme weather conditions. Decent
clothing enhances a person’s esteem and conidence.
This is even more important in the case of children we
are supporting.
Shelter
The rented children home consists of dormitory
including toilets, Kitchen & play area. Children
keep their clothes, books, and other stuff in
cupboards. The premises have bathrooms and
usage water is stored in two big Polymers tanks
on the building slab and water has supply with
pipeline to all the bathrooms and kitchen. In the
evenings, the open hall is used for tuition
classes. The open-air hall in the building is used
as dining hall. Drinking water facility is there in
the premises.
Make a Difference Today
Donate to Spandan Bal Ashram
Your generosity can change lives. At Spandan Bal Ashram, we rely on the support of compassionate individuals like you to continue our mission of providing a nurturing home for orphaned and vulnerable children. Every donation helps us offer quality education, healthcare, emotional support, and a loving environment for our children.
+91 8657773312
Admission Criteria
01
Children who have lost both or single parent
02
Children from Poverty-stricken families
03
Children of disadvantage parents
04
Children of families ravaged by HIV/AIDS
Our Objectives
At Spandan Bal Ashram, our primary objective is to foster the holistic development of orphaned and vulnerable children. We strive to create a loving and secure environment where every child feels valued and protected. By providing comprehensive care, including physical, emotional, educational, and social support, we aim to empower children with confidence, resilience, and a sense of belonging. Additionally, we promote inclusivity and cultural understanding to prepare them for successful integration into society, ensuring they have the tools needed for a bright and fulfilling future.
- To provide an opportunity for children to live in congenial atmosphere with parental love
- To provide food, shelter, education to the children.
- To provide medical care to the children.
- To bring up the children in good discipline to become good citizens.
- To make the children to learn basic new skills to live on their own.